Plane Crash : भयंकर! विमान समुद्रात कोसळलं, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Mississippi Plane Crash Update News : अमेरिकेतील मिसिसिपीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ सेसना 210 विमान कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. लुईझियानाहून फ्लोरिडाला परतताना घडलेल्या या भीषण दुर्घटनेचा तपास सुरू आहे.
US Plane Crash Accident News
US Plane Crash Accident News AI Image
Published On: 

अमेरिकेत एका भीषण विमान अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सहल संपवून घरी परतत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला. मंगळवारी मिसिसिपीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांचे छोटे विमान समुद्रात कोसळले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 50 वर्षीय ब्रेंट स्टोक्स, त्यांचा 16 वर्षीय मुलगा हंटर स्टोक्स, ब्रेंट यांची बहीण आर्लिन नॉक्स, तिचे पती मायकेल नॉक्स आणि त्यांची दोन मुले चार्ल्स होल्डन नॉक्स (12) व ट्रुएट नॉक्स (10) यांचा समावेश आहे. हे सर्वजण फ्लोरिडा राज्यातील फोर्ट मायर्स येथील रहिवासी होते. हे कुटुंब लुईझियाना येथे फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर ते विमानाने आपल्या घरी परतत होते. ब्रेंट स्टोक्स हे स्वतः विमान चालवत होते.

US Plane Crash Accident News
Breaking News : सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिला राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

प्रवासादरम्यान त्यांचे सेसना 210 हे विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि समुद्रात कोसळले. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास विमानाशी संपर्क तुटला. विमान वेगाने खाली येत असल्याची नोंदही करण्यात आली होती. अखेर हॉर्न आयलंडच्या ईशान्य दिशेला समुद्रात विमान कोसळले. अपघाताची माहिती मिळताच अमेरिकेच्या तटरक्षक दलाने शोधमोहीम सुरू केली. सुमारे दोन तासांनंतर विमानाचे अवशेष आढळले.

US Plane Crash Accident News
Bank Update : १ जानेवारीपासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार? काय आहे नेमकं सत्य? वाचा

मात्र, सुरुवातीला प्रवाशांचा शोध लागला नव्हता. त्यानंतर मिसिसिपीच्या सागरी विभागाने रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. अखेर विमानाच्या मुख्य भागात सहाही जणांचे मृतदेह आढळून आले.या दुर्घटनेबद्दल मिसिसिपीच्या सागरी विभागाचे अधिकारी जो स्प्रॅगिन्स यांनी दुःख व्यक्त केले. बचाव आणि शोधकार्यात सहभागी पथकांनी पूर्ण काळजी व जबाबदारीने काम केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अमेरिकेची एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या दोन्ही यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.