अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी
19 year old murdered in Jalna village : जालन्यात बहिणीची बदनामी केल्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील रुई गावात ही घटना समोर आली आहे राजेश कोरकाने असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे. दरम्यान मयत तरुण हा आरोपीच्या बहिणीची बदनामी करत असल्याचा रागातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे...
प्रेमसंबंधाच्या संशयातून धारदार शस्त्राने भोसकून हत्या
प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिघांनी एका तरुणास धारदार हत्याराने वार करून ठार मारल्याची घटना अंबड तालुक्यातील रुई येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव राजेश विष्णू कोरकाने असे आहे. राजेशचे आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. काल दुपारी याच कारणावरून गावातील मंदिरासमोर त्यांच्यात भांडण झाले होते. ग्रामस्थांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले होते. मात्र त्यानंतर राजेशजी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे..
तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
जालन्यातील अंबड तालुक्यातील रुई गावात बहिणीची बदनामी केल्याच्या रागातून 19 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. राजेश कोरकाने असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात संशयित आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.