10th standard student suicide Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Buldhana : धक्कादायक! अभ्यास न केल्यानं शिक्षक रागावले, दहावीच्या मुलाने आयुष्य संपवलं

10th standard student suicide : बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जय बजरंग विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी विनायक महादेव राऊत याने केवळ अभ्यास न केल्यामुळे शिक्षकांच्या रागाने आत्महत्या केली.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Buldhana student suicide : बुलढाण्यामध्ये धक्कादायक आणि हळहळ करायला लावणारी घटना घडली आहे. अभ्यास न केल्यामुळे शिक्षक रागावल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेत आयुष्याचा दोर कापला. नांदुरामधील या घटनेमुळे बुलढाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्याने आयुष्य संपवण्याआधी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्याआधारावर पोलिसांकडून तपास केला जात आहे. विनायक महादेव राऊत असं टोकाचे निर्णय घेणाऱ्या दहावीच्या मुलाचे नाव आहे.

दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विनायक महादेव राऊत याला वर्ग शिक्षकाने काही प्रश्न विचारले. पण विनायकला उत्तर देता आले नाही. त्यावरून वर्ग शिक्षक रागावले. 'तू अभ्यास करत नाही', हे मी तुझ्या आई-वडिलांना सांगेन, असं शिक्षकाने रागावले. त्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या विनायक महादेव राऊत याने गळफास घेत आयुष्याचा दोर कापण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती.

बुलढाण्यामधील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात ही धक्कादायक आणि तितकीच चिंता वाढविणारी घटना घडली. नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत, वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयातील विद्यार्थी विनायक महादेव राऊत हा दहावी शिकत होता. काल शाळेत शिक्षकांनी वर्ग सुरू असताना विनायकला अभ्यासाबद्दल काही प्रश्न विचारले. मात्र त्याबद्दल त्याला उत्तर देता न आल्याने शिक्षक त्याच्यावर रागावले. तुझ्या आई-वडिलांना मी सांगेन असं म्हटलं.

यावरून मधल्या सुट्टीत विनायक ने गावाजवळीलच शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहीली. यात "सुर्यवंशी या वर्ग शिक्षकाने मला रागवले, आई-वडिलांवरूनही बोललेत. त्यामुळे मी फाशी घेत आहे...!" असं लिहिलं आहे . या घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे मराठा आरक्षण अडचणीत; उपसमितीसमोर पेच

Accident: कासार मलईजवळ रिक्षाला मोठा अपघात, चालकासह तिघांचा मृत्यू

Turmeric For Skin: हळदीमुळे चेहऱ्याला होतात हे फायदे; केमिकल क्रिमपेक्षा ट्राय करा ही हळदीपासून तयार पेस्ट

Manoj Jarange Attacks Raj Thackeray: राज ठाकरे कुचक्या कानाचे,मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Lunch Box: मुलांच्या डब्याला द्या 'हे' चमचमीत अन् हेल्दी पदार्थ

SCROLL FOR NEXT