Buldhana Bus Accident on Samruddhi Maharag Protest For Helping Dead Peoples in Accident |Saamtv Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: बुलढाणा बस अपघात: मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळेना; नागरिकांचे अपघातस्थळी अनोखे आंदोलन

Buldhana Bus Accident: बुलढाणा बस अपघाताला पाच महिने उलटून गेलेत. मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी वर्धा (Wardha) येथे आंदोलन सुरू केलं आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १९ डिसेंबर २०२३

Buldhana News:

०१ जुलै रोजी समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात होऊन आग लागली होती. या दुर्घटनेत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या भयंकर घटनेने अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना शासनाकडून अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. याच पाश्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी समृद्धीवरील अपघात स्थळी अनोखे आंदोलन करण्यात आले.

०१ जुलै रोजी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) सिंदखेड राजा नजिक खाजगी प्रवाशी बसला अपघात होऊन आग लागली होती. यात २५ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघातानंतर सरकारने मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र घटनेला साडे पाच महिने होऊनही अद्याप या अपघातातील मृताकांच्या नातेवाईकांना कोणतीही मदत मिळाली नाही.

पाच महिने उलटून गेल्यानंतरही मदत न मिळाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी वर्धा (Wardha) येथे आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व सरकारला आठवण करून देण्यासाठी आज समृद्धी महामार्गावर अपघात स्थळी सिंदखेड राजा परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी २५ मेणबत्ती लावून आंदोलन केले. या अनोख्या निषेध आंदोलनासाठी अपघातस्थळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भयंकर अपघाताने हादरला होता महाराष्ट्र...

१ जुलै च्या मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील खासगी बसच्या अपघाताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाणा (Buldhana Bus Accident) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ भीषण अपघात झाला. आधी गाडीचा अपघात झाल्याने टायर फुटला आणि त्यानंतर डिझेल टॅंक फुटल्याने बसने पेट घेतला होता. या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT