Buldhana News Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना! अपघातानंतर ट्रक पेटला; चालक आणि वाहकाचा होरपळून मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. या घटनेत अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने चालक व वाहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २४ फेब्रुवारी २०२४

Samruddhi Highway Accident News:

समृद्धी महामार्गावरुन एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. या घटनेत अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने चालक व वाहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या वेळी चालकाला झोप लागल्याने भरधाव ट्रक बॅरिकेड्सला धडकून जाग्यावर पलटी झाला. या मोठ्या अपघातानंतर ट्रकने जाग्यावरच पेट घेतला.

ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातचं आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमध्ये ट्रक चालक व वाहकाचा होरपळून मृत्यू झाला. आगीमध्ये ट्रक जळून खाक झाला असून चालक तसेच वाहकाच्या मृतदेहही पुर्णपणे जळालेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हिंगोलीत भीषण अपघात..

हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पीकअपने ९ भाविकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झालेत. (Latest Marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

SCROLL FOR NEXT