Buldhana Accident Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Accident: हृदयद्रावक घटना! अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडले; सासू-सासरे अन् सुनेचा दुर्दैवी अंत

Buldhana Breaking News: या भीषण अपघातात दुचाकीवरील सासू, सासरे अन् सुनेचा दुर्देवी अंत झाला असून सहा वर्षांचा मुलगा बचावला.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी

Buldhana Accident News:

बुलढाण्यामधून एक काळीज पिळवटून टाकणारी भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाणा खामगाव रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सासू, सासरे अन् सुनेचा दुर्देवी अंत झाला. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Buldhana Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा (Buldhana) शहराजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.एका अज्ञात वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडल्याने हा भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील सासू सासरे अन् सुनेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. बुलढाणा खामगाव रोडवरील भादोलाजवळील पोखरी फाट्यावर ही घटना घडली.

सुदैवाने या अपघातात दुचाकीवरील सहा वर्षांच्या मुलाचा जीव वाचला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला रुग्णालयात दाखल केले. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाशिममध्येही भीषण अपघात...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याची घटना वाशिममध्ये घडली. वाशिमच्या (Washim Accident) कारंजा - मूर्तिजापूर मार्गावरील हिंदू स्मशानभूमी जवळ हा भीषण अपघात झाला. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT