Washim Accident: झाडाखाली आराम करत होते... भरधाव कार आली अन्; भीषण अपघातात एकाचा मृत्यू

Washim Latest News: वाशिमच्या कारंजा - मूर्तिजापूर मार्गावरील हिंदू स्मशानभूमी जवळ हा भीषण अपघात झाला.
Washim Accident
Washim AccidentSaamtv
Published On

मनोज जैस्वाल, प्रतिनिधी

Washim Accident News:

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याची घटना वाशिममध्ये घडली. वाशिमच्या कारंजा - मूर्तिजापूर मार्गावरील हिंदू स्मशानभूमी जवळ हा भीषण अपघात झाला. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिमच्या कारंजा बायपासवरून कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील टी पॉईंटकडे एक भरधाव कार येत होती. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने थेट रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत बसलेल्या दोघांना जबरदस्त धडक दिली.

त्यानंतर कार स्मशानभूमीच्या स्मृती प्रवेशद्वाराला जाऊन धडकली. या अपघातात सावलीत बसलेल्या अब्दुल नइम अब्दुल शकील (वय ३६वर्ष) रा. मज्जिद पुरा व अथर्व अमोल दहातोंडे (वय २३ वर्ष, रा. प्रगतीनगर कारंजा) हे तरुण गंभीर जखमी झाले.

Washim Accident
Gautami Patil News: गौतमीच्या अडचणी वाढणार? पनवेलमधील कार्यक्रमानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल

अपघाताच्या घटनेनंतर काही समाजसेवक व स्थानिकांनी जखमीना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुनीर खा मजीद खा वय ४२ वर्ष यांना मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Washim Accident
Girish Mahajan News: 'सुषमा अंधारेंच्या डोक्यावर इलाज करण्याची गरज...' ड्रग्ज प्रकरणातील आरोपांनंतर गिरीश महाजनांची टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com