पुण्याच्या ससून रुग्णालयातून ड्रग्जमाफिया ललित पाटीलने पलायन केले अन् राज्यभरात एकच खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंधारेंच्या या आरोपांना आता गिरीश महाजनांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
ड्रग्जमाफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी याप्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचाही हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. अंधारेंच्या आरोपांनंतर एकनाथ खडसे यांनीही महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आरोपांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.
याबद्दल बोलताना गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी 'काही लोकांच्या डोक्याचा इलाज करावा लागणार आहे. त्यांना पुन्हा हॉस्पिटलला पाठवून त्यांच्यावर इलाज करावा लागेल, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केली.
तसेच यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावरही निशाणा साधला. खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावरही इलाज करावा लागेल असे म्हणत खडसे चारही बाजूंनी घेरले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना दुसरं काही सुचणार नाही.. असा टोला महाजनांनी लगावला.
"खडसेंचे जमीन घोटाळे, दूध संघ घोटाळे आता नवीन एका जमीन उत्कलन करताना त्यांनी रॉयल्टी वाचवले असे नवीन घोटाळे समोर येत आहेत. त्यामुळे ते विदवत्त्या अवस्थेत असल्यामुळे ते वाटेल ते बडबडतात," असेही महाजन म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.