Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident: भरधाव ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळला, दोघांचा जागीच मृत्यू

Truck Accident: बुलडाण्यात ट्रकला भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. पोलिस या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Priya More

बुलडाण्यामध्ये ट्रकला भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भिंगारा घाटामध्ये वळणावर ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ट्रकमध्ये फक्त दोघेच होते की आणखी किती जण होते याचा शोध पोलिस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा - बुऱ्हाणपूर मार्गावरील भिंगारा घाटात ट्रकला अपघात झाला. भरधाव ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. अतिशय दुर्गम आणि चिंचोळ्या मार्गावर अपघात झाल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह दरीतून काढण्याचे काम पोलिस आणि स्थानिक नागरिकांकडून सुरू आहे.

अपघातग्रस्त ट्रकमधून किती जण प्रवास करत होते याची माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे या घाटातून अवजड आणि जड वाहनांना प्रवेश बंदी आहे. असे असताना देखील या मार्गावरून अवजड आणि जड वाहनांची वाहतूक सुरू असल्यामुळे आज ही अपघाताची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

दरम्यान, पंढरपूर जवळच्या मोडनिंबमध्ये चिखलात एसटी बस अडकली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एसटी बस बाहेर काढली. सतत पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या चिखलात एसटी बस अडकली. अक्कलकोट - बारामती ही एसटी बस मोडनिंब बस स्थानकात आली असता चिखलात रूतली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने बस बाहेर काढली. त्यानंतर बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT