Baramati : बारामतीत प्रशिक्षण घेणाऱ्या विमानाचा अपघात, मोठी दुर्घटना टळली

Baramati News : बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला आहे. रेड बर्ड कंपनीचे विमान लँडिंगदरम्यान बिघाड झाला. पुढील चाक निखळल्याने विमान गवतात गेले. विवेक यादव यांनी आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केलं.
baramati
baramatiSaam TV News Marathi
Published On
Summary
  • बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात

  • रेड बर्ड कंपनीचे विमान लँडिंगदरम्यान बिघाडग्रस्त

  • पुढील चाक वाकडे/निखळल्याने विमान गवतात गेले

  • विवेक यादव यांनी आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला

  • कुठलीही जीवितहानी नाही, विमानाचे नुकसान

मिलिंद संगई, बारामती

Baramati Training Aircraft Accident: बारामतीमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या शिकाऊ विमानाचा अपघात झाला आहे. विमान लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेत विमानाचे नुकसान झाले आहे. अपघाताची मिळताच प्रशिक्षणाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. तात्काळ मदतीसाठी उपस्थित कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बारामतीमध्ये विमान अपघाताची घटना घडली. लँडिंग करताना विमानाचे पुढील चाक वाकडे झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. रेड बर्ड या प्रशिक्षण संस्थेंचे हे विमान होते. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास प्रशिक्षण सुरू झाले होते, त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक प्रितिनिधीने दिली आहे. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

baramati
देवाभाऊ महिन्याला ₹१५०० नको, लाडकीचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, साताऱ्याचे नेमकं प्रकरण काय?

शनिवारी (ता. 9) सकाळी विमान उतरत असताना पुढील टायर निखळल्याने हे विमान टॅक्सी वे सोडून बाजूच्या गवतात गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्या नंतर कंपनीच्या कर्मचा-यांनी तातडीने हे विमान बाजूला घेत दुरुस्तीचे काम सुरु केले होते. या संदर्भात समजलेली माहिती अशी की विवेक यादव हे शिकाऊ वैमानिक विमान बारामती विमानतळावर उतरवित असताना अचानक समोरील चाकात बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या नंतर त्यांनी इमर्जन्सी लॅंडीग करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात विमानाच्या समोरील पंख्याचे नुकसान झाले असून चाकानजिकच्या काही भागांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

baramati
अनोखं रक्षाबंधन! एकुलत्या एक बहिणीचं निधन, मृत्यूनंतरही त्या हाताने बांधली राखी, भाऊ-बहिणीची हृदयस्पर्शी कहाणी

या बाबत रेड बर्डकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हा अपघात विमानतळाच्या धावपट्टीनजिक असताना झाल्याने सुदैवाने कसलीही हानी झाली नाही. या पूर्वी दोनदा रेड बर्डच्याच शिकाऊ विमानांचे अपघात झाले होते. त्या वेळेस डीजीसीए यांनी या कंपनीवर निर्बंध लागू केले होते. काही महिन्यांपूर्वी हे निर्बंध उठल्याने पुन्हा त्यांचे प्रशिक्षण सुरु झाले होते.

baramati
BREAKING : जम्मू काश्मीरमध्ये चकमक; २ जवान शहीद, १० जण जखमी, एका दहशतवाद्याचा खात्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com