BREAKING : जम्मू काश्मीरमध्ये चकमक; २ जवान शहीद, १० जण जखमी, एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu & Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक झाली. दोन भारतीय जवान शहीद झाले. एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
Saam TV Breaking News
Saam TV Breaking NewsSaam TV Breaking News
Published On
Summary
  • जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सैन्य-दहशतवादी चकमक

  • दोन भारतीय जवान शहीद, 10 जवान जखमी झाले.

  • एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे,

  • नवव्या दिवशीही चकमक सुरू, शोधमोहीम सुरू आहे

2 Soldiers Martyred, 10 Injured, 1 Terrorist Killed in Kulgam : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद झाले, तर दहा जवान जखमी झाले आहेत. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सध्या सुरक्षा दल कुलगाममधील दुर्गम जंगल परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि इतर सर्व आवश्यक साधनांचा वापर करत आहे. ही चकमक अद्यापही सुरू असून, परिस्थितीवर सैन्याचे बारीक लक्ष आहे. कुलगाममध्ये ही चकमक नवव्या दिवशीही सुरू आहे.

चिनार कोरकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

चिनार कोरने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची पुष्टी केली आहे. पोस्टमध्ये म्हटले की, ऑप अखल, कुलगाम... चिनार कोर राष्ट्रासाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या वीर लेफ्टनंट कर्नल प्रीतपाल सिंग आणि सिपाही हरमिंदर सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली अर्पित करते. त्यांचे शौर्य आणि समर्पण आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. #भारतीयसेना शोकाकुल कुटुंबियांप्रती गहन सहवेदना व्यक्त करते आणि त्यांच्या दुखात सहभागी आहे."

Saam TV Breaking News
अनोखं रक्षाबंधन! एकुलत्या एक बहिणीचं निधन, मृत्यूनंतरही त्या हाताने बांधली राखी, भाऊ-बहिणीची हृदयस्पर्शी कहाणी

घाटीतील सर्वात लांबलचक दहशतवाद विरोधी मोहीम

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील अखल जंगल परिसरात सुरू असलेली चकमक ही खोऱ्यातील सर्वात लांबलचक दहशतवादविरोधी मोहिमांपैकी एक आहे. एक ऑगस्ट रोजी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल येथील जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली होती.

Saam TV Breaking News
Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांचा लाभ बंद होणार, 26 लाख लाडकींची चौकशी सुरू, कुटुंबातील 3 लाभार्थ्यांची यादी तयार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com