chandrashekhar bawankule  saam tv
महाराष्ट्र

'शेतकरी, गरीब व दुर्बल घटकातील नागरिक...'; पंतप्रधानांनी पक्षकार्यासाठी बावनकुळेंना दिल्या 'या' सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सहकुटुंब भेट घेतली.

साम टिव्ही ब्युरो

chandrashekhar Bawankule News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सहकुटुंब भेट घेतली. प्रदेशाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्याशी पहिलीच भेट होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावनकुळे यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

नौदलाच्या ध्वजामध्ये परिवर्तन करून महाराष्ट्राचा गौरव वाढविल्याबद्दल बावनकुळे यांनी यावेळी पंतप्रधानाचे आभार मानले. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे प्रतिक असलेल्या शिवमुद्रेचे रूप नौदलाच्या प्रतीक चिन्हाला प्रदान करण्यात आले आहे, याचा आवर्जून उल्लेख बावनकुळे यांनी या भेटीत केला. बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील पक्ष बळकटीसाठी करीत असलेल्या कामांची माहिती दिली.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार दमदारपणे जनकल्याणाचे काम करीत असून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणासह राज्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते देखील हातभार लावत आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षकार्यासाठी मार्गदर्शन केले.

'शेतकरी, गरीब व दुर्बल घटकातील नागरिक व कुटुंबाच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करावेत, अशी सूचना देखील मोदी यांनी केली.

बावनकुळे कुटुंबीयांनी पंतप्रधानांना दिली गणेश प्रतिमेची भेट

महाराष्ट्रात गणेशोत्सवात साजरा होत असताना या पंतप्रधान मोदीजी यांची सहकुटुंब भेट घेण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने बावनकुळे कुटुंबीयांनी श्री गणेशाची मूर्ती पंतप्रधानांना सस्नेह भेट दिली. यावेळी बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती, मुलगी पायल आष्टणकर व नातू अधिराज आष्टणकर, मुलगा संकेत, सुन अनुष्का त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कुटुंबासह कुशलक्षेम विचारणा केली. नातू अधिराज सोबतदेखील त्यांनी गप्पा देखील केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना लक्ष्मी प्राप्तीसाठी सुसंधी मिळतील, तर कोणाला होईल आजाराचे निदान, तुमची रास काय?

Raosaheb Danve: खरंच नेते म्हणायचं का? फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ

Daily Horoscope: आजचा शुभ दिवस देणार बरंच काही; वाचा तुमचे राशीभविष्य

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

SCROLL FOR NEXT