आशिष शेलारांना किशोरी पेडणेकरांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाल्या, ' प्राणी, पक्षी जसे...'

आशिष शेलारांना माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
ashish shelar and kishori pednekar
ashish shelar and kishori pednekar saam tv
Published On

निवृत्ती बाबर

Kishori pednekar News : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधीच राजकारण तापलं आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर टीकास्त्र सोडणे सुरू झाले आहे. शिवसेनेकडूनही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. 'तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचे का? अशा शब्दात आशिष शेलारांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यावरून आशिष शेलारांना माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ashish shelar and kishori pednekar
Dasra Melava : अखेर दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला (पाहा व्हिडिओ)

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर मुंबईसह राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आशिष शेलारांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर शिवसेना नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'पेंग्विन सेना हे ते म्हणतातच. कमळाबाई हे केवळ आम्हीच नाही, त्यांचेही नेते बोलतात. प्रत्येक वेळी प्राणी, पक्ष्यांना मध्ये ओढू नये. प्राणी, पक्षी जसे कुटुंबवस्तल आहेत. तसा आमचा पक्ष कुटुंबवत्सल आणि उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख आहेत, अशा शब्दात किशोर पेडणेकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

शरद पवारांनी देखील दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, त्यावर भाष्य करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 'शरद पवारांचा सल्ला नरेंद्र मोदी देखील घेतात. जर आज शरद पवार काही सल्ला देताहेत, तर तो महत्वाचा आहे. आम्हालाही कार्यकर्त्यांना हे सांगायचं की इतिहास पुसण्याचं आणि संपवण्याचं काम करू नका. अपवाद वगळले तर एक मैदान, एक झेंडा, एक वक्ता हा आजवरचा विक्रम आहे.

'दसरा मेळावा त्याच मैदानावर होणार आहे. आता सगळे गजनी बनू बघत आहेत. प्रशासन हे गजनी होणार नाही ही अपेक्षा आहे. शरद पवारांचा सल्ला ऐकावा. अर्थात सध्या भलतेच सल्ले ऐकले जाताहेत. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा' हा नियम आहे. ज्यांचा पहिला अर्ज येतो, तो मंजूर होतो हा नियम आहे, असेही त्या म्हणाल्या.

ashish shelar and kishori pednekar
तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचे का?; आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

काय म्हणाले होते आशिष शेलार ?

शिवसेनेने मुखपत्र सामनातून भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यावरून आशिष शेलारांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आशिष शेलार म्हणाले, 'आपण आमच्या कमळाला हिणवायला 'बाई' म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला, आम्ही आता 'पेंग्विन सेना' म्हणायचे का ? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com