गडचिरोलीतील हत्तींना गुजरातमध्ये पाठवण्यास स्थानिकांचा विरोध; वनमंत्री म्हणाले,'पायाभूत व आरोग्य...'

हत्तींची देखभाल व आरोग्य सुविधांबाबत मूलभूत व्यवस्था नसल्याने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने रिलायन्स समूहाच्या जामनगर येथील राधाकृष्ण टेम्पल ट्रस्टला हे हत्ती सोपविण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
Sudhir Mungatiwar
Sudhir Mungatiwarsaam tv
Published On

Gadchiroli News : आलापल्ली- कमलापूर येथून एकूण १३ हत्ती जामनगर येथे रवाना केले जाणार आहेत. या हत्तींची देखभाल व आरोग्य सुविधांबाबत मूलभूत व्यवस्था नसल्याने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने रिलायन्स समूहाच्या जामनगर येथील राधाकृष्ण टेम्पल ट्रस्टला हे हत्ती सोपविण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या निर्णयाचा गडचिरोलीकरांकडून विरोध होत आहे. तसेच यावरून आता वनमंत्री सुधीर मुनगटींवार (Sudhir Mungatiwar) यांनी मत मांडले आहे.

Sudhir Mungatiwar
धक्कादायक! दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही, मुलाने केली माजी सैनिक वडिलांची हत्या

गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या १३ हत्तींना गुजरातच्या जामनगर येथे हलविण्याप्रकरणी गडचिरोलीत संताप व्यक्त होत आहे. आलापल्ली- कमलापूर येथून एकूण १३ हत्ती जामनगर येथे रवाना केले जाणार आहेत. आलापल्लीचे तीन हत्ती रात्रीच्या अंधारात गुपचूप रवाना करण्यात आले आहे. आता अन्य हत्तींना हलविण्याचा प्रयत्न केला जात असताना गडचिरोलीकरांनी सर्व हत्ती पर्यटन स्थळ विकसित करून इथेच ठेवा, अशी मागणी केली आहे.

आलापल्लीचे तीन हत्ती रात्रीच्या अंधारात गुपचूप रवाना करण्यात आले आहे. आता अन्य हत्तींना हलविण्याचा प्रयत्न केला जात असताना गडचिरोलीकरांनी सर्व हत्ती पर्यटन स्थळ विकसित करून इथेच ठेवा, अशी मागणी केली आहे. तसेच यावरून वनमंत्री सुधीर मुनगटींवार यांनीही मत मांडले आहे.

Sudhir Mungatiwar
आशिष शेलारांना किशोरी पेडणेकरांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाल्या, ' प्राणी, पक्षी जसे...'

हत्तींना हलविण्याचा निर्णयावर भाष्य करताना वनमंत्री सुधीर मुनगटींवार म्हणाले की, 'पायाभूत व आरोग्य सुविधांची वाणवा लक्षात घेता हत्तींना हलविणे गरजेचे आहे. गडचिरोलीतील वन्यजीव संस्थांनी देखील हत्तींच्या देखभाल व सुविधेबाबत पुढाकार घेतल्यास त्यांनाही हे हत्ती सोपविले जाऊ शकतात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com