भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा क्रिष्णराज महाडिक (Dhananjay Mahadik Son) सध्या चर्चेत आले आहेत. कृष्णराज महाडिक यांनी सोशल मीडियावर अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबतचा फोटो शेअर केला आहे. कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरु यांच्या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. (Krishanaraaj Mahadik Photo With Rinku Rajguru)
कृष्णराज महाडिक यांनी km.office या इन्स्टग्राम अकाउंटवरुन रिंकू राजगुरुसोबतचा फोटो शेअर केला आहे. रिंकू राजगुरु कोल्हापूरात देवीचं दर्शन घेण्यासाठी गेली असताना हा फोटो काढला आहे. या फोटोवर कृष्णराज महाडिक यांनी 'आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले'. असं कॅप्शनदेखील दिले आहे. या फोटोंवरुन सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेक अंदाज बांधले आहे.
कृष्णराज महाडिक आणि रिंकू यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंटमध्ये रिंकू राजगुरुला ;वहिनीसाहेब' असेदेखील म्हटले आहे. 'झालं झिंग झिंग झिंगाट', 'ठरलं का राव', 'जोडा बाकी शोभतोय', अशा कमेंट्स येत आहे. कृष्णराज आणि रिंकूच्या या फोटोंवरुन सोशल मीडियावर अनेक अंदाज बांधले जात आहेत.
कृष्णराज महाडिक हे भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे. ते राजकारणात सक्रिय आहे. विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. ते समाजकार्य करत असतात. याचसोबत ते युट्यूबर आहेत. ते उत्तम रेसरदेखील आहे. ते नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.