BJP MLA
BJP MLA saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नाराज; पक्षालाच दिला मोठा इशारा

संदिप नागरे

Hingoli News:

आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील गावागावात मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीवरून लोकप्रतिनिधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. याचदरम्यान, भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मराठ्यांना आरक्षण न दिल्यास 2024 मध्ये निवडणूक लढविणार नाही, असा इशारा भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाच्या आक्रमक पावित्र्यानंतर आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तान्हाजी मुटकुळे म्हणाले, 'आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभर गाजत आहे. मागच्या महिन्यात मनोज जरांगे यांच्या प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला होता. मराठा बांधवाना सांगू इच्छितो की, माझा मराठा कुटुंबात जन्म झाला. मराठा बांधवाविषयी माझ्यात मनात कळवळ आहे'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मराठा समाजाला आरक्षण न नसल्याने ज्या अडचणी येतात, त्या मला माहिती आहे. मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्या काळात बऱ्याचशे मराठा समाजातील मुले तहसीलदार, नायब तहसीलदार, डॉक्टर झाले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे, असे ते पुढे म्हणाले.

'येत्या काळात मराठा आरक्षणाला दिलं नाही तर मी २०२४ ची निवडणूक लढणवणार नाही. मराठा बांधवावरील अन्याय पदावरून राहून सहन करू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार आहे. येत्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाग पाडू, असे मुटकुळे पुढे म्हणाले.

'मराठा आरक्षणासाठी सध्या आंदोलन सुरू आहे. त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पत्र देखील दिलं आहे, असेही त्यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: एक महिना कांदा खाल्लाच नाही तर काय होईल?

पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका

Pune Police PC Hit And Run Case | दोषींवर कडक कारवाई करणार, पोलीस ॲक्शन मोडवर

Unseasonal Rain : नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका; केळी आणि पपई बागांचे नुकसान

HSC Result 100% Mark: बारावीत 100 टक्के मार्क मिळवणारी ती मुलगी कोण? उत्तर मिळालं!

SCROLL FOR NEXT