Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंची कार फोडणाऱ्या तिघांना जामीन; न्यायालयात नेमकं काय घडलं? वाचा...

Gunaratna Sadavarte Latest News: पोलिसांनी तिघांनाही कोर्टात हजर केलं असता, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Gunaratna Sadavarte car smashers granted bail  What exactly happened in mumbai court
Gunaratna Sadavarte car smashers granted bail What exactly happened in mumbai courtSaam TV
Published On

Gunaratna Sadavarte Latest News

प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची गुरुवारी तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे यांच्यासह दोघांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड करणारे तिघेही जण हे मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघांनाही कोर्टात हजर केलं असता, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gunaratna Sadavarte car smashers granted bail  What exactly happened in mumbai court
Maharashtra Politics: शिंदे गटाला मोठा धक्का, मराठा आरक्षणाला विलंब केल्याने बड्या नेत्याचा राजीनामा

मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 5 हजाराच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला. यासोबत तिघांना एक अटही घालण्यात आली आहे. नेमकं न्यायलयात काय घडलं? सदावर्तेंच्या वकिलाचा मंगेश साबळे आणि त्यांच्या साथीदारांवरुन काय युक्तिवाद केलेत? जाणून घेऊयात थोडक्यात.

वकील गुणरत्न सदावर्ते यांची मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनावर विरोध दर्शवणारी भूमिका स्विकारली. यावरुन मंगेश साबळे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केली. विशेष म्हणजे या घटनेनंतर मंगेश साबळे आणि त्यांच्या साथीदारांनी पळ न काढता ते पोलिसांच्या हवाली झाले. यावरुनही कोर्टात जोरदार युक्तीवाद झाला.

सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना कोर्टात सांगितलं की, मंगेश साबळे हे सरपंच आहे. याच आरक्षणाच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:ची गाडीही जाळली होती. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठहल्ल्यांच्या निषेधार्थ मंगेश साबळे यांनी आपली स्वत:ची गाडी जाळल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

वकिलांनी देखील कोर्टात हाच मुद्दा कोर्टात उपस्थित केला. या मुद्द्याचं खंडण करताना मंगेश साबळें यांच्या वकिलांनी युक्तीवाग करताना म्हटलं, की स्वत:ची गाडी जाळताना संबधित व्यक्तीचा किंवा आताच्या घटनेचा कुठेही उल्लेख नाही. ते प्रकरण वेगळ आहे. विशेष तिघांवर याआधी कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही, ते अर्थात हे सराईत गुन्हेगार नाही असा युक्तीवाद वकिलांनी कोर्टात केला.

दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यावर कोर्टाने मंगेश साबळे आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना 5 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्याचबरोबर मुंबईत येण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घेण्याची अटही कोर्टाने घातली आहे. म्हणजे आता मंगेश साबळे आणि त्यांच्या साथीदारांना मुंबईत येण्यासाठी कोर्टाची परवानगी लागणार आहे.

Gunaratna Sadavarte car smashers granted bail  What exactly happened in mumbai court
Sanjay Gaikwad: गाडी फोडण्याची शिक्षा कमीच, गुणरत्न सदावर्तेंना... शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com