gopichand padalkar controversy statement on jayant patil Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Gopichand Padalkar Controversy : फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर बेताल,जयंत पाटलांवर पुन्हा खालच्या पातळीवर टीका

Gopichand Padalkar Controversy : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तंबीनंतरही जयंत पाटील यांच्यावर वादग्रस्त आणि खालच्या पातळीवर टीका केली आहे. या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादंग माजलं आहे.

Bharat Mohalkar, Namdeo Kumbhar

भरत मोहळकर

Gopichand Padalkar Controversy Statement On Jayant Patil : मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही सुसंस्कृत भाजपचे असंस्कृत आमदार गोपिचंद पडळकरांनी बेताल वक्तव्य केलंय... मात्र आमदार असताना गावगुंडासारखी भाषा कऱणाऱ्या गोपिचंद पडळकर भानावर कधी येणार? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तंबी दिल्यानंतरही भाजपचे पडळकर बेताल सुटलेत...आपण एका मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतो, याचं भान सोडून पडळकरांनी पुन्हा एकदा गल्लीतल्या गावगुंडासारखी भाषा वापरत जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत टीका केलीय.. एवढंच नाही मंगळसुत्र चोरीच्या आरोपाचा दाखला देत जयंत पाटील यांच्या पत्नीविषयीही वादग्रस्त वक्तव्य केलंय..

पडळकरांच्या याच वक्तव्यामुळे विरोधक मात्र आक्रमक झालेत.. लातों के भूत बातो से नहीं मानते, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी पडळकरांवर हल्लाबोल केलाय. पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सुरु झाला तो पडळकरांनी जयंत पाटलांचे वडील राजारामबापू यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे....तर पडळकरांच्या वक्तव्यानंतर पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करुन नाराजी व्यक्त केली.. यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही पडळकरांना जाहीरपणे तंबी दिली होती.

कधी शरद पवार, कधी सुप्रिया सुळे, कधी जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त करुन पडळकर सतत चर्चेत असतात.. मात्र पडळकरांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचा शब्द डावलून पडळकर बेताल सुटलेत... त्यामुळे पडळकर मुख्यमंत्री फडणवीसांना जुमानत नाहीत का? फडणवीसांचा शब्द डावलून पुन्हा जयंत पाटलांवर टीका करण्याची हिंमत पडळकरांची होत असेल तर महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्यासाठी पडळकरांना कुणाचं पाठबळ आहे? त्यामुळे सुसंस्कृत भाजपचा असंस्कृत चेहरा बनलेल्या पडळकरांना भाजपचं शीर्ष नेतृत्व कसं आवरणार...?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishal Brahma : टायगर श्रॉफसोबत काम, अरबाजला नडला; ड्रग्समध्ये अडकलेला 'तो' अभिनेता कोण?

Dussehra auspicious yog: विजयादशमीचा शुभ दिवस! या ४ राशींवर ‘शुभ योगांचा’ वर्षाव, आयुष्यात येणार मोठा बदल

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

SCROLL FOR NEXT