eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

सरपंचाची निवड जनतेतूनच करा, भाजपच्या बड्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : राज्यातील सरपंचांची निवडणूक 2017 मध्ये फडणवीस सरकारने (Devendra Fadnavis Government) घेतलेल्या निर्णयाप्रमाणे थेट जनतेतूनच करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले आहे.

या निवेदनात बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2017 मध्ये सरपंचाची निवड जनतेतूनच करावी, असा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला. 2017 पूर्वी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमार्फतच व्हायची. मात्र वारंवार अविश्वास ठराव मांडण्याच्या खेळामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण व्हायचे. अविश्वास ठराव आणला गेल्यानंतर राजकीय मैदानात घोडेबाजारही होत असे.

ही परिस्थिती टाळण्यासाठी व ग्रामपंचायत कारभाराला स्थिरता येण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने सरपंचाची निवड जनतेतून करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. या शिफारशीनुसार 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सरपंच निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलला. राज्य सरपंच संघटनेनेही सरपंचाची निवड निर्वाचित सदस्यांमार्फत करण्यास विरोध दर्शवला होता. आता नवीन सरकारने फडणवीस सरकारचाच निर्णय कायम ठेवावा, असेही बावनकुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार , नितीन नवीन आणि राघव चड्ढा तातडीने दिल्लीला रवाना

पिकलेल्या केळीपासून 5 मिनिटांत बनवा 5 चविष्ट रेसिपी, बच्चेकंपनी आवडीने खाईल

Maharashtra Politics: भास्कर जाधवांचा सूचक WhatsApp स्टेटस, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मान्सूनचे आगमन

Income Tax Return: करदात्यांसाठी मोठी बातमी! ITR भरला पण हे काम विसरलात? लगेचच पूर्ण करा प्रोसेस, शेवटची तारिख आली समोर

SCROLL FOR NEXT