सकाळी नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही? मग फक्त एकदाच करा तयारी; आठवडाभर नाश्त्याची चिंता मिटेल

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

सकाळी मुलांच्या शाळेची तयारी, ऑफिसची घाई, डब्याची तयारी यामुळे नाश्ता बनवणे अनेकांसाठी कठिण होते. तसेच सकाळी नाश्त्याला नेमकं काय बनवायचे हा प्रश्न देखील महिलांसमोर रोजच असतो.

Easy Breakfast Recipe

हेल्दी आणि टेस्टी ५ पदार्थ

अशावेळी तुम्हालाही जर रोज काय बनवायचा? असा प्रश्न असेल आणि वेळ मिळत नसेल तर तुम्ही असे काही पदार्थ आधीच बनवून ठेवा जे आठवडाभर ताजे आणि हेल्दी राहतील.

Easy Breakfast Recipe

इडली किंवा डोसाचे पीठ

साऊथ इंडियन ब्रेकफास्ट हा सर्वात हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ता आहे. तुम्ही विकेंडला इडली डोशाचे तयार पीठ करून ठेवा. दररोज सकाली उठल्यानंतर फक्त पॅनवर डोसा करणे हे अत्यंत झटपट काम असेल.

Idli-Dosa Batter | Google

ओव्हरनाईट ओट्स

जर तुम्हाला सकाळी काहीतरी पौष्टिक खायचे असेल, पण वेळ नसेल, तर रात्रीच ओव्हरनाईट ओट्स तयार करून ठेवा. एका काचेच्या जारमध्ये ओट्स, दूध, मध, चिया सीड्स आणि आवडते ड्रायफ्रूट्स किंवा फळे घालून नीट मिक्स करा आणि झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवा.

Overnight Oats | GOOGLE

पराठा रेसिपी

लहाना मुलांना पराठे आवडत असतील तर तुम्ही आदल्या दिवशी बटाटा, मूग डाळ किंवा मेथीचे सारण बनवून फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी फक्त लाटून गरमा गरम पराठे भाजून घ्या.

Stuffed Paratha Prep | yandex

पौष्टिक थेपला रेसिपी

मेथी, कोथिंबीरचे थेपले अनेकांना आवडतात. तुम्ही आदल्या दिवशी रात्री थेपले लाटून चांगले भाजून ठेवू शकता. हे थेपले एअर टाईट डब्यात २-३ दिवस ताजे राहतात.

Thepla or Muthiya | GOOGLE

रोस्टेड मखान्याचे किंवा ड्राय फ्रूट्स लाडू

जर सकाळी नाश्त्याला अजिबात वेळ नसेल आणि हलकेफुल्के काहीतरी हवे असेल, तर मखाणे तुपामाध्ये कुरकुरीत भाजून मसाला लावून डब्यात भरून ठेवा. तसेच, खजूर आणि सुकामेव्याचे लाडू तुम्ही आधीच बनवून ठेवा.

Roasted Makhana / Energy Laddoos | Yandex

NEXT: वजन कमी करण्यापासून ते पचनक्रिया सुधारणेपर्यंत बडीशेपचे पाणी पिण्याचे 5 जबरदस्त फायदे

Fennel Seeds Drink Benefits
येथे क्लिक करा...