maharashtra politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'उद्धव ठाकरे वरून भगवे अन् आतून हिरवे, तर शरद पवार...'; भाजपच्या बड्या नेत्याचा निशाणा

Maharashtra Political News : भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही दानवेंनी टीका केली.

Vishal Gangurde

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : राज्यातील सर्व राजकीय धुळवडीच्या निमित्ताने रंगाची उधळण केली. अनेक राजकीय नेते कुटुंबीयांसोबत होळी साजरी केली. पक्षाचे कार्यकर्त्यांनी आवडत्या नेत्याला रंग लावण्यासाठी झुंबड पाहायला मिळाली. होळीनिमित्त राजकीय नेत्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोणता रंग लावाल, यावर भाष्य करताना रावसाहेब दानवे म्हणाले, 'संजय राऊत पूर्णपणाने हिरवा. तर उद्धव ठाकरे वरून भगवा आतून हिरवा' तर जयंत पाटील यांच्यावर भाष्य करताना दानवे म्हणाले, 'जयंत पाटील यांचं काम असं आहे. रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा गुंतुनी गुंतून साऱ्या. रंग माझा वेगळा. गुंतून त्यात सगळ्या पाय माझा मोकळा'.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय शुभेच्छा द्याल, यावर दानवे म्हणाले, 'परमेश्वरा, आज जे चाललंय, असं चालायचं. बुद्धी त्यांना दे, जे लोकांना आश्वासन देतात आणि पाळत नाही, त्यांची अशीच बुद्धी राहू दे. ज्यांनी असंच काम करत राहावं. सध्याचा विरोधी पक्ष खूप छान आहे. त्यांच्या बोलणे आणि वागण्यामुळे आज आम्ही सत्तेत आहोत'.

नेत्यांना कोणता रंग द्याल, यावर दानवे म्हणाले, 'नरेंद्र मोदी - भगवा, अमित शहा- भगवा, देवेंद्र फडणवीस - भगवा, राहुल गांधी - राहुल गांधीला कुठे रंग आहे, ते फिरंगी माणूस आहेत. शरद पवार साहेबांनी आतापर्यंत सगळे रंग लावले. भाजपसोबत गेले, ममता बॅनर्जी यांच्यासोबत गेले, शेख अब्दुल्ला यांच्याबरोबर गेले, मायावतीं यांच्यासोबत गेले. सोनिया गांधी यांच्यासाठी राहुल गांधींचा रंग. अब्दुल सत्तार यांना मी मागेच पदवी दिली, गोल टोपी हिरवा रंग. माझा एक छोटा कार्यकर्ता पक्षांतर करून त्यांच्या विरोधात उभा राहिला. 2200 मताने खेळ हुकला'.

'मला तिथे जायला जर परवानगी असती तर 50000 मतांनी पडले असते. दुसऱ्यांना पाडण्यासाठी मिया,जरा ध्यान रखो, ज्यादा टऱ्या मत मारो. सिल्लोडवाल्यांनो वेळीच सावरा. जगात जागेचे भाव वाढले, पण सिल्लोडमध्ये वाढले का? कारण त्यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. एक दिवस सिल्लोड अल्पसंख्याकबहुल तालुका होणार आहे. आपल्या नात्यागोत्यातील महाराष्ट्रातील सगळे गोल टोप्यावाले भरले. लंबी टोपीला महत्त्वच नाही. येणाऱ्या काळात अब्दुल सत्तार रंग बदलतील का, कोणत्याही पक्षात जाऊ द्या, ते हिरव्या सोबतच आहे, असे दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT