Badlapur Shocking : सणाला गालबोट! धुळवडीचा रंग काढायला गेले अन् पाण्यात बुडाले; बदलापुरात नदीत बुडून चौघांचा मृत्यू

Badlapur Shocking News : बदलापुरात धुळवड सणाला गालबोट लागलं आहे. धुळवडीचा रंग काढायला गेले, त्यानंतर चौघे पाण्यात बुडाले. बदलापुरात नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे.
Badlapur
Badlapur ShockingSaam tv
Published On

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापूर : राज्यभरातील लोक धुळवड साजरा करताना दिसत आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक धुळवड साजरी करत आहेत. बदलापुरातही धुळवड सणाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. बदलापुरातील अनेक सोसायट्यांमध्ये नागरिक मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करताना दिसत आहेत. याच धुळवडीदरम्यान गालबोट लागणारी घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान दुर्देवी घटना घडली आहे. बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बदलापुरात सणाला गालबोट

बदलापुरात धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या मुलांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे. बदलापूरच्या चामटोली परिसरात राहणारे चौघे मुले होते. चारही मुले चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे होते. चौघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Badlapur
Crime News : होळीच्या दिवशी रक्तरंजित राडा; शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

नेमकं काय घडलं?

बदलापूरच्या चामटोली भागात राहणाऱ्या चौघांनी धुळवड खेळली. धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीजवळ पोहोचले. उल्हास नदीत चौघे अल्पवयीन मुले उतरले. या चौघांना पाण्याचा अंदाज आला. त्यामुळे चौघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाले. चामटोली राहणाऱ्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. चौघांच्या मृत्यूने चामटोली परिसरात खळबळ उडाली आहे.

Badlapur
Ladki Bahin Yojana : लाडकीला 2100 रुपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी एका वाक्यात सांगितलं, VIDEO

चामटोली परिसरात राहणारे आर्यन मेदर(१५), आर्यन सिंग (१६), सिद्धार्थ सिंग (१६), ओमसिंग तोमर (१५) या चौघांचा मृत्यू झाला आहे. चौघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. चौघांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. चौघांच्या मृत्यूने धुळवड सणाला गालबोट लागलं आहे.

Badlapur
Dombivli : RSS शाखा दगडफेक प्रकरणी कारवाई; सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com