Gopichand Padalkar Eknath Shinde News Saam TV
महाराष्ट्र

Gopichand Padalkar: 'राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ...' गोपीचंद पडळकरांचा CM शिंदेंवर निशाणा; नेमकं काय म्हणाले?

Gopichand Padalkar on Dhangar Reservation: आरक्षणाचा मुद्दा निकालात काढा, अन्यथा धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.. असे पडळकर म्हणालेत.

Gangappa Pujari

Dhangar Reservation News:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले असतानाच ओबीसी बांधवही आक्रमक झाल्याचे दिसत आहे. ओबीसी नेत्यांनी आज जालनामध्ये महारॅलीचे आयोजन केले आहे. अशातच आता धनगर बांधवही आरक्षणाच्या लढ्यासाठी मैदानात उतरले असून गोपीचंद पडळकरांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

"माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे..." असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

महायुतीकडून निराशा...

"फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे. आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारचा नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होइल , ही आशा सामान्य धनगरांना आहे. मात्र त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे.." असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे. समित्या गठित करूण धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना समान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे. आपण वेळीत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा, अन्यथा धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.. असा इशाराही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT