पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवार आणि छगन भुजबळ भेटत आहे. महाराष्ट्रात सामाजिक घडामोडी होत आहे, त्याला अनुसरून ही भेट असू शकते. आजच्या भेटीनंतर भुजबळ स्वतः भेट का होती? हे स्पष्ट करतील अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
भुजबळ महायुतीचे मोठे नेते (Maharashtra Politics) आहेत. महायुतीला नुकसान होईल, असं कोणतेही पाऊल ते उचलणार नाही. शरद पवार यांना भेटणे यात काहीही गैर नाही. आम्हीही अनेक वेळेला त्यांना भेटतो, असं बावनकुळे म्हणाले आहेत. तर छगन भुजबळ कालच्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण द्यायला शरद पवारांकडे गेले असतील, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलीय.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
शरद पवार आणि छगन भुजबळ भेटीबाबत काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी(Sharad Pawar and Chhagan Bhujbal) दिलीय. मी पुण्यात आहे तर, पवार साहेब मुंबईत आहेत. छगन भुजबळ त्यांना कशासाठी भेटायला गेलेत, हे मला सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिलीय. तर मंत्री दादा भुसे यांनी छगन भुजबळ शरद पवारांना कुठल्या कामासाठी भेटत आहेत, हे माहित नसल्याची प्रतिक्रिया दिलीय. भुजबळ यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केल्याचं दादा भुसे (Dada Bhuse) यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ शरद पवारांची भेट
काल केलेल्या टीकेनंतर आज छगन भुजबळ शरद पवारांना भेटत (Sharad Pawar News) आहेत, ही शरद पवारांची उंची असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर, शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट गुलदस्त्यात आहे. भुजबळ यांनी शरद पवारांची वेळ घेवून गेलं असल्याचं मिटकरी यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.