महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजप महाराष्ट्रात संघटनबांधणीला नवे बळ, ९६३ मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण

महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक विस्तारात मोठी प्रगती झाली असून, संपूर्ण राज्यभरात एकूण १२२१ मंडळांची यशस्वी स्थापना करण्यात आली आहे, हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण १२२१ मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरतोय. संपूर्ण राज्यभर १२२१ मंडळ गठीत करण्यात आले आहेत, त्यापैकी ९६३ मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील २५८ मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत.

प्रमुख विभागवार पाहता:

• कोकण-ठाणे विभागात १८४ मंडळ

• उत्तर महाराष्ट्रात १८४ मंडळ

• पश्चिम महाराष्ट्रात २२२ मंडळ

• विदर्भात ३१३ मंडळ

• मराठवाड्यात २०७ मंडळ

• मुंबई विभागात १११ मंडळ

मंडळ गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होतं.

भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT