BJP Rajya Sabha Candidates Saam Tv
महाराष्ट्र

BJP Rajya Sabha Candidates: राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार ठरले, विनोद तावडेंसह १० नेत्यांची नावं चर्चेत

Maharashtra BJP Core Committee Meeting Update: भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी रात्री पार पडली. या बैठकीमध्ये राज्यसभेसाठीच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. १० ते १२ जणांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.

Priya More

Summary -

  • भाजप कोअर कमिटीची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली

  • राज्यसभेसाठी १० ते १२ नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली

  • विनोद तावडे आणि रामदास आठवले यांची नावे आघाडीवर

  • नावे दिल्लीत पाठवण्यात आली आहेत

  • २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम यादी जाहीर होणार

गणेश कवडे, मुंबई

राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं ठरली असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत १० ते १२ जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली. रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांची नावं फायनल करण्यात आली आहेत. ही नावं दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. वर्षा बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची रात्री बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह १२ प्रमुख नेते उपस्थित होते.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी रात्री पार पडली. या बैठकीमध्ये अनेक नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली. राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रितम मुंडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांच्यासह इतर नावांची चर्चा होत आहे. कोअर कमिटीच्या नावांचा प्रस्ताव दिल्लीत चर्चेला जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेऊन या नावांची चर्चा करतील. त्यानंतर नावांवर शिक्कामोर्तब केला जाईल. २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावे जाहीर केली जाणार आहेत.

रामदास आठवले यांची टर्म संपत आहे. त्यामुळे रामदास आठवले यांना मित्रपक्ष म्हणून भाजप्या कोट्यातून संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्या जागेवर मागच्या वेळी पंकजा मुंडे या निवडणूक लढल्या होत्या. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना राज्यसभेची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भागवत कराड यांची देखील टर्म संपत आहे त्यामुळे त्यांना देखील पुन्हा संधी देतात का हे पाहणे महत्वाचे ठरते.

धैर्यशील पाटील, रावसाहेब दानवे यांचा देखील लोकसभा नि़वडणुकीवेळी पराभव झाला होता. त्यांची नावं देखील राज्यसभेसाठी चर्चेत आहेत. १० ते १२ नावांवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. आता रवींद्र चव्हाण दिल्लीत जाऊन राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा करतील. त्यानंतर नावं फायनल केली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

'पोलिसांनी गळा दाबला, प्रायव्हेट पार्टवर मारलं'; दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अमानुष मारहाणीची आपबिती

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या उमरग्यात थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढले

Changing Room Safety Tips: चेंजिंग रूममध्ये कुठे कुठे असू शकतो छुपा कॅमेरा? कपडे ट्राय करताना 'या' ५ जागा नक्की तपासा

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT