Latur Drought: पाणी नाही तर जगणार कसं? १९७२ पेक्षाही भयानक दुष्काळ, लातूरच्या निटूरमधील ग्रामस्थांचा आक्रोश

Maharashtra Desha: मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे दुष्काळ परिस्थिती गंभीर झाली आहे. लातूरच्या निटूरमधील ग्रामस्थांनी साम टीव्हीशी संवाद साधत दुष्काळाचे भयान वास्तव सांगितले.

लातूरच्या निटूरमधील पाणीटंचाईने 1972 चाही भयावह दुष्काळ मागे टाकला आहे. तहानलेल्या जनावरांचे डोळ्यांदेखत होणारे हाल पाहून ग्रामस्थांचं काळीज तुटत आहे. घशाला कोरड पडली असताना जगण्याची आशाच मावळत चालल्याने, असंच राहिलं तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा आक्रोश गावकरी करत आहेत. साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी लातूरच्या निटूर गावात नेमकी काय परिस्थिती आहे? हे महाराष्ट्रापुढे आणण्याचा प्रयत्न केला.

गावकऱ्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, '१९७२ ला दुष्काळ पडला होता. तेव्हा पाणी होते पण खायला अन्न नव्हते. पण यंदाच्या दुष्काळातली परिस्थिती गंभीर आहे. सध्या कुठेच पाणी नाही आहे. माणसांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना पाणी कुठून आणायचे. सरकारने पाणी पुरवठा केला पाहिजे. पाणी नसल्यामुळे आम्ही यावेळी जगणार नाही हा प्रश्न पडला आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.