भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारांविरोधात बंडखोरी.
पक्षांतरांमुळे जुन्या कार्यकर्त्यांत असंतोष
तिकिट वाटपातील नाराजीमुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढलीय.
चंद्रपूर जिल्ह्यातील ४ नगरपरिषदांमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पक्षांत्तरांना पेव फुटले. भाजपनं आपल्या मित्रपक्षासह मविआमधील नेत्यांना फोडत आपल्या गोटात आणलं. त्यानंतर उमेदवारी जाहीर केली मात्र आता भाजपच्या उमेदवारांविरोधातच बंडखोरी झालीय.
शेवटच्या दिवसापर्यंत या निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार शोधताना पक्षश्रेष्ठींना तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सर्वात जास्त इनकमिंग भाजपात झाल्याचं पहायला मिळालंय. भाजपने आपले मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील काही नेते आपल्या पक्षात घेतलेत. आता चंद्रपुरात भाजपलाच मोठा धक्का बसलाय.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झालीय. येथील भद्रावती, राजुरा, वरोरा आणि गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करत काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवलीय. तर दुसरीकडे राजुरा नगर परिषदेत भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. पक्षात प्रवेश करताच त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलीय, त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.