Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

भाजपला शिवसेना ठाकरे गटाकडून धक्का! २ बड्या नेत्यांसह २९ जणांनी कमळाची साथ सोडली

Nagar Parishad Elections Heat Up: धाराशिवमध्ये नगरपरिषद निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का. २ माजी नगरसेवकांसह २९ कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. महायुती आणि महाआघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच धाराशिवमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका बसला आहे. दोन माजी नगरसेवकांसह २९ कार्यकर्त्यांनी भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

धाराशिवमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपच्या दोन माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यासह २९ कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन माजी नगरसेवकांसह २९ कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळे धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला याचा फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lauki Salad Recipe: लहान मुलंही आवडीने खातील दुधीचे सलाड, उन्हाळ्याची जबरदस्त रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मार्च- एप्रिल आणि मेचा हप्ता कधी येणार?

Raja Shivaji: 'सर्वांनी महाराजांसाठी काम केलं'; 'राजा शिवाजी'साठी कलाकारांनी नाकारलं मानधन

Maharashtra News Live Update: पुणे- पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

West Bengal CM: मोठी बातमी! सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री, उद्या सकाळी ११ वाजता होणार शपथविधी

SCROLL FOR NEXT