Newlywed Woman Shares Video Before Taking Her Life
Newlywed Woman Shares Video Before Taking Her LifeSaam

'लग्नाच्या १० महिन्यांत १० दिवसही खूश नाही, मी आयुष्य..' VIDEO तयार करून विवाहितेनं आयुष्य संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल

Newlywed Woman Shares Video Before Taking Her Life: रायपूरमधील २४ वर्षीय विवाहित तरूणीने आत्महत्या केली. तिनं आत्महत्यापूर्वी व्हिडिओ शेअर करून आयुष्य़ संपवलं.
Published on

छत्तीसगडमधील रायपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. १० महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या महिलेनं व्हिडिओ शेअर करून आत्महत्या केली आहे. तिच्यावर घराची जबाबदाऱ्या होत्या. लग्नानंतर तिचे आयुष्य बदलेल अशी अपेक्षा तिला होती. मात्र, तसं घडलं नाही. सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास तरूणीला सहन झाला नाही. तिनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी व्हिडिओवरून तपासाला सुरूवात केली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मनीषा गोस्वामी (वय वर्ष २४)असे मृत विवाहित तरूणीचे नाव आहे. तिचे १० महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. खरंतर ती रायपूर येथील रहिवासी होती. ती कुटुंबात सर्वात मोठी होती. तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. तिचे वडील एकटेच घर चालवत होते. लग्नानंतर तिचे आयुष्य बदलेल असं तिला वाटलं होतं. पण सासरच्या मंडळींनी तिला त्रास द्यायला सुरूवात केली.

Newlywed Woman Shares Video Before Taking Her Life
फडणवीसांच्या फलटण दौऱ्याआधी मोठी घडामोड; डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना बेड्या

सुरूवातीला छोटे मोठे वाद झाले. मात्र, घरात दररोज भांडणे व्हायची. मनीषाचे पती आशुतोष, दीर आणि सासरे तिला कायम त्रास द्यायचे. हुंड्यावरून अनेकदा वाद व्हायचे. कुटुंबाकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून मनीषानं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. ती मानसिकदृष्ट्या खचली.

Newlywed Woman Shares Video Before Taking Her Life
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का; बड्या नेत्यानं सोडली कमळाची साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

मनीषाने मृत्यूपूर्वी व्हिड़िओ तयार केला. पतीकडून सतत मारहाण, सासूकडून छळ, या त्रासाला मनीषा कंटाळली. १० महिन्यांच्या लग्नात १० दिवसही आनंदात राहू शकली नाही, असं तिनं व्हिडिओत म्हटलंय. 'माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नाही. मी आयुष्याला कंटाळली आहे', असं म्हणत तरूणीनं आयुष्य संपवलं आहे.

या घटनेनंतर तरूणीच्या वडिलांनी थेट डीडी नगर पोलीस ठाणे गाठले. तसेच सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीनुसार, गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मोबाईल फोन आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com