Shruti Vilas Kadam
रितेश देशमुख यांनी त्यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत मोठा खुलासा करत सांगितले की, या चित्रपटासाठी अनेक मोठ्या कलाकारांनी एकही रुपया मानधन घेतले नाही.
रितेशने सांगितले की, हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे सर्व कलाकारांनी आदर म्हणून मोफत काम केले.
या चित्रपटात सलमान खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन यांसारख्या मोठ्या कलाकारांचा सहभाग आहे.
रितेश म्हणाले की, “सर्वांनी महाराजांसाठी काम केलं,” आणि हीच त्यांच्या २३ वर्षांच्या करिअरमधील खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हा चित्रपट ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि स्वराज्याच्या लढ्याची कथा मांडतो.
चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही दमदार प्रतिसाद मिळत असून प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक होत आहे, या चित्रपटाने आतापर्यंत ५४ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.