Devendra Fadnavis on Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis on Sharad Pawar: शरद पवारांच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...

Devendra Fadnavis on Sharad Pawar Retirement: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शरद पवार यांच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Satish Daud

Devendra Fadnavis on Sharad Pawar Resignation Statement: महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला. 'लोक माझे सांगाती' या आपल्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला. (Latest Marathi News)

ज्यांच्या नेतृत्वात पक्षाची स्थापना झाली आणि पाळंमुळं महाराष्ट्रात रुजली, त्या शरद पवारांनीच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते सैरभैर झाले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. तसंच काहींनी तर तुमचा हा निर्णय मान्य नसल्याचं सांगत जोपर्यंत तुम्ही निर्णय बदलणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका पवारांसमोर घेतली. (Breaking Marathi News)

दरम्यान, शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शरद पवार यांच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आपण पुढे काय ते बोलू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात बोलत होते.

आता तरी मी एवढेच म्हणेल, हा पवार साहेबांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक निर्णय किंवा फैसला आहे. या स्टेजला यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही. त्यांच्या पक्षातही अनेक मंथन सुरू आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, हे लक्षात आल्यानंतरच त्यावर योग्य प्रतिक्रिया देता येईल, असंही फडणवीस म्हणाले. (Maharashtra Political News)

मी शरद पवार  (Sharad Pawar) साहेबांचं पुस्तक वाचलेलं नाही. मात्र मला ही एक पुस्तक लिहायचं आहे, ते मी योग्य वेळी लिहिणार त्यामुळे नेमकं त्यांनी काय लिहिलं आहे, हे मला माहिती नाही. मला काय वाटते अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी मी पुस्तक लिहिल त्यात तुम्हाला दिसेल, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT