Sharad Pawar Retirement News: भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरवला; संजय राऊतांचं सूचक ट्विट

Sanjay Raut Tweet On Sharad Pawar Retirement Statement: या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
Sanjay Raut On Sharad Pawar
Sanjay Raut On Sharad Pawar Saam TV
Published On

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पक्षाचे नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत आहेत. मात्र, अजूनही पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut On Sharad Pawar
Sharad Pawar News: शरद पवारांच्या घोषणेनंतर ठाकरे गटात चलबिचल; उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर जाणार

दरम्यान, या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. "गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता", असं राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

त्याचबरोबर "आज इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत. भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरवला", असंही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अध्यक्षपदावरून पायउतार झालो असलो तरी, सार्वजनिक कार्यातून कुठेही दूर जाणार नाही. साठ दशकांहून अधिक काळ जनमानसांत काम करत आलोय आणि त्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही. सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असेन, तिथे तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन, असेही शरद पवार म्हणाले.  (Maharashtra Political News)

निवृत्तीच्या भाषणात नेमके काय म्हणाले पवार...?

राज्यसभेची अजून तीन वर्ष बाकी आहेत,

तीन वर्षांनी पुन्हा निवडणूक लढवणार नाही.

कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे

राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त व्हायचा निर्णय घेतला

आपण मला खंबीर साथ दिली हे मी विसरू शकत नाही

राष्ट्रवादीची सदस्य समिती नेमावी

समितीनं संघटनेची जबाबदारी कुणाला द्यायची याचा निर्णय घ्यावा

सगळ्यांनी बसून पुढचा निर्णय घ्यावा

माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातून नाही.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com