bjp corporators andolan in kolhapur against mahapalika administration Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur: महापालिका प्रशासनास भाजपने दिला अल्टीमेटम, नेमकं काय घडलं कोल्हापुरात?

bjp corporators andolan in kolhapur against mahapalika administration: महापालिकेने कामात सुधारणा केली नाही तर येत्या काळात मोठे जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा भाजपच्या वतीने माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी महापालिका प्रशासास दिला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

कोल्हापूर महापालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज (मंगळवार) भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी नगरसेवकांनी लाक्षणिक उपोषण करत महापालिका प्रशासनास कारभार सुधारण्याबाबत अल्टीमेटम दिला.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात भाजपा आक्रमक झाले आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या चौकात महापालिकेच्याच अनागोंदी कारभाराचा पंचनामा करत लाक्षणिक उपोषण केले. गेले साडेतीन वर्ष महापालिकेत प्रशासक राज आहे. तरी देखील शहर प्रगतीपथावर जाण्यापेक्षा बकाल होत चालल्याचा आराेप भाजपच्या माजी नगरसेवकांनी या आंदाेलन प्रसंगी प्रशासनावर केला.

याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे भाजपच्या माजी नगरसेवकांनी म्हटले. यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lassi Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात पंजाबी ढाबा स्टाईल थंडगार, क्रीमी लस्सी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Shweta Tiwari Photos: चाळीशीतही श्वेता तिवारीच्या सौंदर्याचा जलवा! ब्लॅक डिझायनर ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटो

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्ता वाढणार; पगारात इतक्या रुपयांची होणार वाढ

Accident News : कोकणात भीषण अपघात, दशावतार नाट्य मंडळाची गाडी काँक्रीट मिक्सरला धडकली अन्...

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

SCROLL FOR NEXT