RAVINDRA CHAVAN’S MESSAGE TO BJP WORKERS | NAGPUR GRADUATES CONSTITUENCY ELECTION saam tv
महाराष्ट्र

‘केंद्र-राज्याची कामे सांगा! भरबैठकीत भाजप कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाणांच्या कानपिचक्या

Ravindra Chavan’s Advice to BJP Workers: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मतदार नोंदणी, सोशल मीडिया आणि सरकारच्या कामांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या.

Bharat Jadhav

  • नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू

  • नागपुरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका

  • नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पदवीधर मतदारांपैकी किमान ५० हजार नवीन मतदार नोंदणीचे लक्ष्य

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावलाय. या बैठकीत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांची कानउघडणीदेखील केली.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण अंदाजे बारा लक्ष सुशिक्षित पदवीधर मतदारांपैकी किमान 50 हजार नवे मतदार नोंदणी करून घ्यावे आणि सोशल मीडियावर तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीत सक्रिय होत केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांचे प्रमोशन करावे अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या.

नागपुरात मंचावर राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, भाजप आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, परिणय फुके आणि शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी असताना या कानपिचक्या त्यांनी दिल्या. नागपूर शहर, ग्रामीण आणि वर्धा मिळून सुमारे अंदाजे ७० लाख लोकसंख्या आहे. यापैकी सुशिक्षित पदवीधर अंदाजे 12 लाख असावेत असा अंदाज आहे.आपली राज्यात दीड लाखांपेक्षा जास्त सक्रिय सदस्य असलेली पार्टी आहे.

येथील 80 टक्के लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वर सक्रिय असल्याचे सांगितलंय. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्री यांनी घेतलेले निर्णय पाहून त्यासाठी डिजाइन बनवून तुमचे नाव, तुमचे पद यांचा उल्लेख करून आपल्या पेजवर टाकत राहिलो आणि शेअर करत राहिलो तर महाराष्ट्रात एक चांगले वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरू, असा सल्ला रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.

काही शक्ती अजेंडा घेऊन उतरतील. मग आपण काय करावं? तुमच्यापैकी नगरसेवक किती आहेत इथे. फक्त नगरसेवकच नाही, बाकी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आदी मुख्य कार्यकर्त्यांनी लक्ष दिलें पाहिजे. आपण जेव्हा लोकांच्या भेटी घेतो. तेव्हा ते आपल्या समस्या सांगतात. त्या ऐकल्याच पाहिजे. पण त्याच वेळी आपण बोलतो झालो पाहिजे. आपली भाजप कार्यकर्ते म्हणून वेगळी ओळख. आपण ठरवायचे. आपण राजकारणात कशासाठी आहोत. सत्तेसाठी नव्हे तर राष्ट्राचे हित साधण्यासाठी आहोत, हे लक्षात ठेवावं असंही चव्हाण म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलांच्या जीवाशी खेळ! जिल्हा परिषदेच्या शाळेत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार; ठाकरेंच्या शिवसेनेचं स्टिंग ऑपरेशन

GEN -Z करणार 'नवनिर्माण', आता ठाकरेंची भिस्त GEN-Z वर?

कंपन्या बुडाल्य़ा, राजकारण तापलं; चाकणमधून उद्योगांचं स्थलांतर, 36 हजार कंपन्या बंद

Maharashtra News Live Update: शहापूर 80 वा स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून भातसा धरणाला तिरंगी विद्युत रोषणाईने सौंदर्य खुलून निघाले

महाराष्ट्राला भोंदूगिरीचा विळखा, पुण्यात बाबाबुवा झाले उदंड, पुण्याचा खरात कोण?

SCROLL FOR NEXT