Police intervene after BJP and NCP (Ajit Pawar faction) workers clash in Parbhani’s Ward No. 4 during municipal election tensions. Saam Tv
महाराष्ट्र

महापालिकेचा महारणसंग्राम! मित्रपक्ष आमने-सामने; भाजप–अजित पवार गटात तुंबळ हाणामारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तिकीट नाकारणे, उमेदवारी अर्ज माघारी घेणे आणि पक्षीय पाठिंब्यावरून महायुतीतील मित्रपक्षांमध्येच वाद उफाळून येत आहेत.

Omkar Sonawane

परभणीतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढला

अर्ज माघारी आणि पाठिंबा देण्यावरून वाद उफाळला

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात

सध्या महापालिकेचा महासंग्राम सुरू आहे. मात्र महासंग्रामाचे रूपांतर महायुद्धात होते की काय असा सवाल उपस्थित होत आहे. तिकीट नाकारणे किंवा अर्ज माघारी घेण्यावरुन भाजप आणि त्यांच्याच मित्रपक्षांमध्ये जोरदार राडा सुरू आहे. बी फॉर्म पळवणे किंवा थेट गिळून घेणे, फार्म हाऊसचे गेट तोडणे, आत्मदहनाचा इशारा इत्यादी हायव्होलटेज ड्रामा राज्यातील सर्व लोकांनी बघितला.

अशातच परभणी शहरात राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यामध्ये देशमुख हॉटेल परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे काहीकाळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस या ठिकाणी दाखल होत मध्यस्ती केली आणि तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रभाग क्र ४ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अक्षय देशमुख यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचे उमेदवार वामन मोरे यांनी अर्ज मागे घेवून भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप केला.

तर मला त्यांनी अनेकवेळा उमेदवारी मागे घेण्यासाठी पैसे द्यावे म्हणून पैसे मागितले. असा आरोप देशमुख यांनी केला. पण मी त्यांना भाव दिला नाही मी कशाला मारहाण करू तो आरोप चुकीचा असल्याचे अक्षय देशमुख यांनी सांगत झालेले आरोप खोडून काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT