Gopichand Padalkar Controversy Statement on Jayant Patil Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर...; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

Gopichand Padalkar Controversy Statement on Jayant Patil : जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकारांची जीव पुन्हा घसरली आहे. तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसुत्र चोरलं, असे म्हणत पडखळकरांनी वाद ओढावून घेतला आहे.

Namdeo Kumbhar

Gopichand Padalkar On Jayant Patil : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली आहे. जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र चोरलं, ते त्यांनी सांगावं असं पडळकर म्हणालेयत. माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात, त्यांनीच सांगावं, मी कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं म्हणत पडळकरांनी पुन्हा बेताल विधान केलं आहे. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद वाटतं नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर वाद उफळला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांच्या तंबीनंतर ही पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्याविरोधात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलेय. ते सांगलीमध्ये बोलत होते.

माझ्या डोक्यात जायची वाट बघू नका. डोक्यात जाण्याचा प्रयत्न कराल ती तुमच्यासाठी काळीकूट अंधाराची रात्र असेल. महाराष्ट्र संस्कृती सभा झाली,आणि मला आय बहि‍णीवर शिव्या देत होते. मला गोप्या-गोप्या म्हणत होते, मी तुला जंत्या म्हटलं तर चालेल का..? अरे त्या जयंत्याला चॅलेंज आहे, आणि त्यांच्या कुत्र्याला . जातीवंत पाटील असेल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन मला वेळ द्या, त्यांनी सांगायचे आहे, ईश्वरपूर की वाळव्यात वेळ सांगा, त्याठिकाणी मी येतो. भीती घालून गोपीचंद घाबरणारा नाही. शेर पैदा होते है बनाये जाते नही.
गोपीचंद पडळकर, भाजप आमदार

जयंत पाटलांच्यावर केलेल्या टिकेबाबत आमदार गोपीचंद पडळकरांनी आपली भूमिका स्पष्ट करत केलेल्या त्या विधानावर ठाम असल्याचं पुन्हा स्पष्ट केले. त्याच वक्तव्यावरून जयंत पाटलांना डिवचले आहे. पूर्वीच्या काळात दत्तक घेतले जायचं, भांड्यावर दत्तक घेतले जात होते, मागे मागे आलेल्याना दत्तक घेत होते,मला वाटलं तसेच काही तर आहे, अश्या शब्दात गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्यावर पुन्हा एकदा टीका केली.

तसेच मला उचलण्याची भाषा केली जात आहे, पण जयंत पाटील व त्यांच्या कुत्र्यांना माझे चॅलेंज आहे, तुम्ही जातीवंत पाटील असाल तर पत्रकार परिषद घेऊन ठिकाण-वेळ जाहीर करा, मी त्या ठिकाणी येतो,असे खुले आव्हान देखील पडळकरांनी दिले आहे. तसेच मला गोप्या म्हणलं जातंय, मग मी जयंत पाटलांना जंत्या म्हणू का ? अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

दुःखद! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही प्राण सोडले, धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT