Congress leader Vijay Wadettiwar addresses media amid explosive claims of BJP corporators being in touch with Congress ahead of Maharashtra Council elections. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपचे 100 नगरसवेक काँग्रेसच्या संपर्कात, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, राजकारणात भूकंप?

Vijay Wadettiwar Claims Bjp Corporators Support Congress Political Crisis: विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा विजय वडेट्टीवार यांचा दावा केला आहे.

Omkar Sonawane

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विधानपरिषदेची निवडणूक होणार असून त्यापूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विदर्भात नगरसेवकांच्या कथित पळवापळवीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक उचलले जात आहेत, असा दावा केला आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. महायुतीमध्ये फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असला तरी महाविकासआघाडीमध्ये अजूनही कुठलाच निर्णय झालेला दिसत नाहीये. अशातच विदर्भातील काही काँग्रेस नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या राजकीय घडामोडींवर विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला, नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून फोडाफोडी केली जात आहे. 15-15 लाख रुपये देऊन मतांची खरेदी होत असेल तर लोकशाही धोक्यात येईल.

पुढे ते म्हणाले, आमच्याही संपर्कात भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. त्यांच्यातही प्रचंड वाद आहेत, दुसरा गट आम्हाला मदत करायला तयार आहे. पण आम्ही त्या भानगडीत पडत नाही, जो घोडेबाजार चालले आणि तो उत्सव चाललेला आहे.

तसेच उद्योगपती, ठेकेदार, मोठमोठे कंत्राटदार हे आता भविष्यातील त्या विधान परिषदेत येणाऱ्या काळात हे चेहरे दिसतील म्हणजे सामान्य माणूस कुठेही दिसणार नाही अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीबाबत विचारल्यानंतर, अद्याप काही ठरलेलं नाही. जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत मी काही निर्णय घेणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea-Coffee Avoid: चहा-कॉफी १५ दिवस बंद केल्यावर शरिरात होतात हे फायदेशीर बदल, डाइटपेक्षा हा बदल नक्की करा

IAS तुकाराम मुंढेंनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार; २१ वर्षांत २५ वी बदली

Children health in summer: पुढील 5 दिवस मुलांसाठी धोकादायक! नवतपामुळे देशभर उष्णतेचा कहर वाढणार

Yavatmal Accident: भरधाव टिप्परनं दोघांना चिरडलं; होमगार्डची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

बोल्डनेसचा तडका! 'या' भोजपुरी अभिनेत्रीच्या कातिल सौंदर्यावर नेटकरी झाले फिदा; पाहा व्हायरल फोटो

SCROLL FOR NEXT