Shreya Maskar
दिवाळीची सुट्टी म्हणजे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याची खास संधी! नोव्हेंबर महिन्यात अनेक ठिकाणी फिरण्याचा आनंद घेता येतो. महाराष्ट्रातील ही सुंदर पर्यटनस्थळे आवर्जून फिरा.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. वेण्णा तलाव, आर्थर सीट पॉइंट, विल्सन पॉइंट, लिंगमळा धबधबा आणि प्रतापगड किल्ला ही येथील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.
पुणे आणि मुंबईच्या जवळ असलेले लोणावळा हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी आणि लोहगड किल्ला ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली हे सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. जवळच देवबाग बीच आणि सिंधुदुर्ग किल्ला ही ठिकाणेही पाहता येतात.
सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण दिवाळीच्या सहलीसाठी उत्तम आहे. येथील टेबल लँड हे आशियातील मोठ्या पठारांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट, राजपुरी लेणी आणि स्ट्रॉबेरी फार्म ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली घाट हे पश्चिम घाटातील सुंदर ठिकाण आहे. हिरवीगार जंगलं, डोंगररांगा आणि धबधबे यामुळे अंबोली पर्यटकांना आकर्षित करते. अंबोली धबधबा, हिरण्यकेशी मंदिर आणि महादेवगड पॉइंट ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
रायगड जिल्ह्यातील माथेरान हे महाराष्ट्रातील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. लुईसा पॉइंट, इको पॉइंट, चार्लोट तलाव, पॅनोरमा पॉइंट आणि अलेक्झांडर पॉइंट ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.