Shreya Maskar
मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा हवा असेल, तर वसई-विरार परिसरातील निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, हिरवीगार वनराई आणि सुंदर उद्याने फिरायला नक्की जा.
विरार पश्चिमेकडील अथांग अर्नाळा समुद्रकिनारा पसरलेला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील शांत वातावरण, नारळाची झाडे आणि समुद्राच्या लाटांचा आवाज पर्यटकांना आकर्षित करतो.सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहता येतो.
अर्नाळा किल्ला हा समुद्रातील बेटावर वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येते.
वसई पश्चिमेकडील सुरुची बीच हा शांत वातावरणासाठी ओळखला जातो. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरातील सुरुचीची झाडे आणि मोकळा किनारा यामुळे येथे निवांत वेळ घालवता येतो. समुद्रकिनारी सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेता येतो.
वसई किल्ला हा वसई-विरार परिसरातील महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. पोर्तुगीज काळातील वास्तू, जुन्या कमानी, भव्य तटबंदी यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर परिसर हा हिरवीगार वनराई, डोंगर आणि नैसर्गिक पायवाटांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी येथे नक्की जा.
चिंचोटी धबधबा हा वसई परिसरातील लोकप्रिय निसर्गरम्य स्पॉट आहे. हिरव्यागार डोंगरातून जाणाऱ्या पायवाटा आणि धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.