Navi Mumbai : दिवाळीची सुट्टी पडली? लहान मुलांसोबत फिरा नवी मुंबईतील 'ही' ७ अनोखी ठिकाणे

Shreya Maskar

नवी मुंबई

मुंबईच्या गजबजाटापासून थोडे दूर जाऊन शांत वातावरणात वेळ घालवायचा असेल, तर नवी मुंबईमध्ये अनेक सुंदर आणि कमी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. येणारा वीकेंड येथे प्लान करा.

Navi Mumbai | google

पारसिक हिल

सीबीडी बेलापूर येथे पारसिक हिल हे सुंदर ठिकाण आहे. सकाळी फिरायला जाणारे, व्यायाम करणारे आणि निसर्गाचा आनंद घेणारे अनेक लोक येथे येतात. पावसाळ्यात डोंगरावरील हिरवाई अधिकच खुलून दिसते.

Parsik Hill | google

करावे फ्लेमिंगो पॉइंट

नेरूळ-सीवूड्स परिसरात करावे गावात करावे फ्लेमिंगो पॉइंट आहे. येथे खाडीकिनारी असलेली खारफुटीची जंगले आणि पाणथळ परिसर पाहायला मिळतो. विशेषतः हिवाळ्यात स्थलांतर करून येणारे फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी येथे पाहण्याची संधी मिळते.

Flamingo Point | google

कोपरखैरणे गाव होल्डिंग तलाव

कोपरखैरणे परिसरातील हा तलाव संध्याकाळी निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. तलावाभोवती फिरण्यासाठी जागा असून सकाळी आणि संध्याकाळी स्थानिक नागरिक येथे फेरफटका मारण्यासाठी येतात.

Koparkhairane village holding lake | google

बेलापूर किल्ला

नवी मुंबईच्या इतिहासाची ओळख करून देणारे ठिकाण म्हणजे बेलापूर किल्ला. हा किल्ला पोर्तुगीजकालीन इतिहासाशी संबंधित आहे. पुढे मराठ्यांनीही या किल्ल्यावर ताबा मिळवला होता.

Belapur Fort | google

वडाळे तलाव

नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील शांत ठिकाणांमध्ये वडाळे तलावाचा समावेश होतो. तलावाभोवतीचा परिसर आणि पाण्याचे शांत वातावरण यामुळे येथे काही वेळ निवांत घालवता येतो.

Wadale Lake | google

ओवे धरण

खारघर येथील ओवे गावाजवळ ओवे धरण वसलेले आहे. शहरातील गर्दीपासून दूर काही वेळ शांतपणे घालवायचा असेल, तर हे ठिकाण चांगले आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी पाण्यावर पडणारे आकाशाचे प्रतिबिंब आणि डोंगरांचे दृश्य मन प्रसन्न करते.

Owe Dam | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : मुंबईच्या कुशीत लपलंय 'हे' सुंदर हिल स्टेशन, एकदा भेट दिल्यावर पुन्हा जावंसं वाटेल

Mumbai | AI PHOTO
येथे क्लिक करा...