Shreya Maskar
मुंबईतील गजबजलेल्या वातावरणापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवायचा असेल, तर मुलुंडमधील योगी हिल्स हे एक सुंदर ठिकाण आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडील जंगल परिसराला लागून असलेल्या या टेकडीवर ट्रेकिंग, निसर्गभ्रमंती आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो. मित्रमैत्रिणींसोबत छोटा ट्रेक, वीकेंडला फिरायला नक्की जा.
योगी हिल्सचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथून दिसणारे निसर्गरम्य दृश्य. टेकडीच्या उंच भागावर पोहोचल्यानंतर आजूबाजूची हिरवीगार जंगले आणि तुळशी तलावाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. काही ठिकाणांहून विहार तलाव आणि पवई तलावाचाही परिसर दिसतो.
योगी हिल्स हे छोट्या ट्रेकसाठी ओळखले जाते. येथे डोंगराळ आणि काही ठिकाणी खडकाळ पायवाटांवरून चालत टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते. वाटेत लहान पठार आणि मंदिर परिसर दिसतो. साधारणपणे ३० ते ४० मिनिटे लागतात.
तुळशी तलाव, हिरवीगार जंगले, पक्षी आणि फुलपाखरे, डोंगरमाथा यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तसेच सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहून डोळे दिपतील.
योगी हिल्सला भेट देण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू विशेष आकर्षक असतात. मुंबईतील मुलुंड पश्चिम येथून योगी हिल्सच्या परिसरात पोहोचता येते.
पावसाळ्यात निसरड्या वाटांवर काळजी घ्या. जंगलात एकटे फिरू नका. वनविभागाचे नियम आणि प्रवेश परवानगी पाळा. पिण्याचे पाणी सोबत ठेवा. चांगल्या ग्रिपचे स्पोर्ट्स शूज वापरा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.