big stone falls on road near amboli ghat waterfall Saam Digital
महाराष्ट्र

Amboli Ghat Traffic Update: आंबाेली घाटात 250 फूटावरुन भलामाेठा दगड रस्त्यावर काेसळला, जाणून घ्या वाहतुकीची स्थिती, Video

big stone falls on road near amboli ghat waterfall : हा भलामोठा दगड रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. सध्या येथील वाहतुक सुरळीत सुरु आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

सिंधुदुर्गातील आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारा भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीकडे जावून स्थिरावला आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

हा भलामोठा दगड रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. सध्या येथील वाहतुक सुरळीत सुरु आहे. या रस्त्यावरुन जाणारे पर्यटक दगड पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे दगड कोसळून रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्यामुळे रस्ता वाहतूकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहन चालक व वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar CM Name : नितीशकुमारांवर भाजपची सावध भूमिका, बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स

Maharashtra Live News Update: पुण्यातील मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेणार

Delhi car blast : डॉक्टरांच्या दहशतवादी जाळ्यावर NIA चा छापा, सहा राज्यांमध्ये तपास, धक्कादायक माहिती उघड

Nora Fatehi : "मोठी किंमत मोजावी लागेल..."; नोरा फतेही संतापली, ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीनं सोडले मौन

IPL Retention 2026: आयपीएलमध्ये सर्व टीम्सची रिटेंशन लिस्ट जाहीर; पाहा कोणत्या टीममधून कोणता खेळाडू रिलीज?

SCROLL FOR NEXT