Ladki bahin yojana  saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये हफ्ता मिळणार, मंत्र्याचं मोठं विधान

Minister Uday Samant On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता लवकरच मिळण्यास सुरूवात होणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत मोठं विधान केले.

Priya More

Summary -

  • लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता लवकरच मिळणार

  • मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान

  • विरोधकांच्या टीकेला उदय सामंतांनी दिले प्रत्युत्तर

  • डिसेंबर- जानेवारीचे ३००० रुपये लवकरच मिळण्याची शक्यता

संजय सूर्यवंशी, नांदेड

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपयांचा हफ्ता दिला जाणार आहे. फडणवीस सरकारकडून यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लाडकींना २१०० रुपये हफ्ता देण्याबाबत मोठं विधान केले आहे. उदय सामंत यांनी सांगितले की, 'लाडक्या बहिणीना २१०० देण्यासाठी आमचा अभ्यास सुरु आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.' नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी हे मोठं विधान केले.

लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या विरोधकांना उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबईमध्ये रविवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी लाडकींना २१०० रुपये कधी मिळणार असा सवाल केला होता. आदित्य ठाकरेंच्या या प्रश्नाचे उत्तर देताना उदय सामंत त्यांनी त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, 'शिवाजी पार्क येथे काल झालेल्या सभेत विचारलं गेलं की २१०० रुपये कधी देणार. जे पूर्वी लाडकी बहीण योजनेला विरोध करत होते आता म्हणत आहेत २१०० कधी देणार?'

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार याबाबत उदय सामंत यांनी सांगितले की, 'लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबत आमचा अभ्यास सुरु आहे. योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल. कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नका.' असे आवाहन त्यांनी लाडक्या बहिणींना केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील पक्षांनी प्रचार करताना आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपयांवर करू अशी घोषणा केली होती.

महायुती सरकार येऊन बरेच महिने झाले तरी देखील सरकारने अद्याप २१०० रुपये हफ्ता देण्यास सुरूवात केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी २१०० रुपयांचा हफ्त्याबाबत सरकार कधी घोषणा करत आहे याची वाट पाहत आहे. आता महापालिका निवडणुकीदरम्यान देखील महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली जात आहे.

दरम्यान, लाडकी बहिणी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे ३००० रुपये खात्यात कधी येणार याची वाट पाहत आहेत. हे पैसे मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी येतील असे सांगितले जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट देखील केल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत महत्वाची अपडेट दिली. 'लाडकी बहीण योजना थांबणार नाही. महिलांना पैसे लवकर येतील.', अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्वतःच्याच अत्याचाराचा रचला बनाव, विद्यार्थिनीचे कारण ऐकून पोलीसही चक्रावले; बीडमधील धक्कादायक प्रकार

चौफेर टीकेनंतर डाव फिरवला; काँग्रेस-भाजप आघाडीची नोंदणी रद्द, मालेगावात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीदरम्यान मारहाण प्रकरणी मोठी अपडेट

Tuesday Horoscope : आनंदाला सीमा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात चमत्कार घडणार

Gulgule Recipe: घरच्या घरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट गुळगुळे कसे बनवायचे; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT