Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana December January 3000 Rupees Installment May Delay: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाणार शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी

लाडकीचा हप्ता लांबणीवर जाणार

काँग्रेसने थेट निवडणुक आयोगाला लिहलं पत्र

महापालिका निवडणुकीआधीच लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापलं आहे. लाडकीच्या हप्त्यावरून काँग्रेसने थेट निवडणुक आयोगाला पत्र लिहून सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसनं या पत्रात काय म्हटलंय? लाडकीचा हप्ता नेमका कधी मिळणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ४ दिवसात लाडकीच्या खात्यात खटाखट ₹ ३००० येणार, बड्या मंत्र्यांची घोषणा

लाडकींना संक्रांतीनंतर हफ्ता? (Ladki Bahin Yojana Installment Come After Makarsankranti)

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा 3 हजार रुपयांचा हप्ता 14 जानेवारीला दिला जाणार आहे. 15 जानेवारीला मतदान आहे. म्हणजेच मतदानाच्या पूर्वसंध्येला दिल्या जाणाऱ्या या हप्त्यामुळे काँग्रेस आक्रमक झालीय... काँग्रेसनं थेट पत्राद्वारे राज्य निवडणुक आयोगाकडे लाडकीच्या हप्त्याबद्दल तक्रार केलीय...

काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर दोन महिन्यांचे 3 हजार रुपये एकत्रित देणे ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांवर प्रभाव टाकणारी असून, सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान करण्यास प्रवृत्त करणारी आहे. हा प्रकार सामूहिक सरकारी 'लाच' ठरतो आणि यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे. त्यामुळे डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 चे पैसे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वितरित करावेत.

नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्रित जमा होण्याची शक्यता असल्यानं लाडकीचा वर्षाचा पहिला सण संक्रांत आणखी गोड होणार आहे. मात्र महायुती सरकारच्या या निर्णयावरुन विरोधकांनी हल्लाबोल केलाय.मात्र, लाडकी बहिणींना दिल्या जाणाऱ्या हप्त्याला विरोध केल्यामुळे भाजपनं काँग्रेसवर सडकून टीका केलीय. लाडकीबद्दल काँग्रेसचं विष बाहेर आलं, असं म्हणत मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय..

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज! निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणुक आयोगानं आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यावेळीही लाडकी बहीण योजनेचे हप्ते थांबवण्यात आले होते. मात्र आता महापालिका निवडणुकीत थेट मतदानाच्या अगोदर लाडकीच्या खात्यात पैसे येणार असल्याचं जाहीर केलं जातयं..त्यामुळे काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणुक आयोगानं राज्य सरकारकडून अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाडकीच्या खात्यात निवडणुकीच्या आधी पैसे येणार की नंतर? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या ३ ते ४ दिवसात मिळणार ३००० रुपये?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com