Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या ३ ते ४ दिवसात मिळणार ३००० रुपये?

Mukhamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत ३००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
Mukhamantri Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana beneficiaries may receive ₹3000 soon as the Maharashtra government prepares to release pending installments.canva
Published On
Summary
  • आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थींना दिलासा

  • नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच जमा

  • डिसेंबर व जानेवारी मिळून ३००० रुपये मिळण्याची शक्यता

राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर आता लवकरच महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना १५०० रुपयांचा निधी देण्यात आला नाही. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सरकारने नोव्हेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला.

Mukhamantri Ladki Bahin Yojana
Income Tax Refund Delay: ITR च्या रिफंडसाठी एक वर्षापर्यंत पाहावी लागेल वाट, काय आहे कारण? परतफेडीवर व्याज मिळेल का?

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी ३१ डिसेंबरला देण्यात आला. तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे मकर संक्रांतीपूर्वीच मिळणार आहेत. दरम्यान १५ जानेवारी रोजी राज्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान असल्यानं काँग्रेसकडून यावर आक्षेप घेण्यात आला होता. काँग्रेसनं या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवलंय. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळणार का हे पहावं लागेल.

Mukhamantri Ladki Bahin Yojana
EPFO मध्ये मोठा बदल; पाच वर्ष असो की १०वर्ष झटक्यात मिळेल जुना PF नंबर; जाणून घ्या प्रोसेस

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत?

या योजनेसाठी ज्या महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया केलेली नाही, त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर इतकी होती. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे राज्यात महायुतीची सत्ता आल्याचं म्हटलं जातं. दरम्यान महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली ही योजना आधी मध्यप्रदेशात सुरू करण्यात आली होती. तेथेही ही योजना लोकप्रिय ठरलीय. या योनजेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com