Devendra Fadnavis and Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंकडून भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती

Big Setback for BJP in Solapur: सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. शिवसेना शिंदे गटाने भाजपचा बडा नेता फोडला. माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते आनंद तानवडे यांनी भाजपची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का

  • माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते आनंद तानवडे यांचा शिंदेगटात प्रवेश

  • तिकीट नाकारल्यामुळे भाजपवर गंभीर आरोप

  • शिंदे गटाची जिल्हा परिषद निवडणुकीत ताकद वाढली

जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत पश्चिम महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडली. सोलापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने भाजपलाजोरदार झटका दिला. भाजपचे सोलापूर जिल्हा परिषद माजी विरोधी पक्ष नेते आनंद तानवडे यांची भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपची साथ सोडत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान शिंदेगटाची ताकद वाढली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आनंद तानवडे यांनी भाजपची साथ सोडली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. भावाला निवडणुकीचे तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज होते. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे यांचे तिकीट कापल्याने पक्षाला रामराम ठोकल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपच्या स्थापनेपासून तानवडे परिवार हा भाजपशी एकनिष्ठ होता. बाबासाहेब तानवडे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे पहिले आमदार होते. तर स्वतः आनंद तानवडे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे गटनेते राहिले आहेत. पक्ष सोडल्यानंतर आनंद तानवडे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टीवर जोरदार टीका केली.

‘कल्याणशेट्टी यांनी भाजपत घराणेशाही सुरु केली असून निष्ठावंत लोकांवर अन्याय केला. त्यामुळे भाजप सोडण्याची वेळ आमच्यावर आली.', अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आनंद तानवडे यांनी केली आहे. जुन्या आणि निष्ठावंत नेत्याने पक्षाची साथ सोडल्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vatana Batata Rassa Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी झणझणीत वटाणा-बटाटा रस्सा भाजी! पाहा ही सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: कणकवलीमध्ये भाजपचा दुसरा उमेदवार बिनविरोध

घरात टाकली धाड; 61 किलो चांदी अन् नोटांचा डोंगर पाहून पोलीस आयुक्तांचे डोळे झाले पांढरे

Motorola Signature: प्रत्येक फोटो होईल तुमची Signature; जबरदस्त कॅमेऱ्यासह Motorola Signature लॉन्च, वाचा संपूर्ण माहिती

Pune Accident : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT