Badlapur Politics: भाजप नेत्याकडून शिवसेना नगरसेवकाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकारण तापले; थरकाप उडवणारा VIDEO समोर

badlapur bjp leader assaults shiv sena corporator video: बदलापुरमध्ये शिवसेना नगरसेवकाला भाजप नेत्याने बेदम मारहाण केली. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Badlapur Politics: भाजप नेत्याकडून शिवसेना नगरसेवकाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकारण तापले; थरकाप उडवणारा VIDEO समोर
badlapur bjp leader assaults shiv sena corporator videoSaam Tv
Published On

Summary -

  • बदलापूरमध्ये शिवसेना नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

  • भाजप पदाधिकारी बंटी म्हसकर यांच्यावर गंभीर आरोप

  • मारहाणीचा CCTV व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला सुरू

मयूरेश कडव, बदलापूर

बदलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापूरमधील शिवसेना नगरसेवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. भाजप पदाधिकारी बंटी म्हसकर आणि त्यांच्या साथीदारांनी शिवसेना नगरसेवक हेमंत चतुरे यांना मारहाण केली. मारहाणाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेमुळे बदलापूरमध्ये राजकारण तापले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना मारहाण करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी म्हसकर आणि त्यांच्या साथीदारांनी ही मारहाण केल्याचा आरोप शिवेसेनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या मारहाणीत हेमंत चतुरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हेमंत चतुरे यांना मारहाण करतानाचे सीसीटीव्ही समोर आले आहेत. त्यामुळे बदलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Badlapur Politics: भाजप नेत्याकडून शिवसेना नगरसेवकाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकारण तापले; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Badlapur : बदलापूर स्वीकृत नगरसेवक प्रकरणात नवा ट्विस्ट, भाजपच्या नव्या उमेदवारावर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास हेमंत चतुरे हे बदलापूरात एका सोसायटीत पूजेसाठी गेले होते. त्याठिकाणी भाजपच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी येऊन हेमंत चतुरे यांना जबर मारहाण केली. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी म्हसकर यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Badlapur Politics: भाजप नेत्याकडून शिवसेना नगरसेवकाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकारण तापले; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

बंटी म्हसकर हे भाजपच्या नगरसेविका हेमांगी म्हसकर यांचे पती आहेत. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात बंटी म्हसकर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.या घटनेनंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

Badlapur Politics: भाजप नेत्याकडून शिवसेना नगरसेवकाला बेदम मारहाण, बदलापुरात राजकारण तापले; थरकाप उडवणारा VIDEO समोर
Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com