Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

Badlapur News : बदलापूरजवळील बेंडशीळ भागात अवैध डोंगर खोदकाम सुरू असल्याचा आरोप होत आहे. शेकडो झाडांची कत्तल झाल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून चौकशीची मागणी होत आहे.
Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा नेमकं प्रकरण काय?
Badlapur NewsSaam Tv
Published On
Summary
  • बदलापूरजवळ बेंडशीळ भागात अवैध डोंगर खोदकाम सुरू

  • शेकडो झाडांची कत्तल; पर्यावरणाला गंभीर धोका

  • ग्रामपंचायत व स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना नाही

  • चौकशी व दोषींवर कडक कारवाईची मागणी

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापूर जवळच्या बेंडशीळ भागात काही भूमाफियांनी सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू केले असल्याची बातमी समोर आली आहे . या ठिकाणची जमीन भुईसपाट करण्यात आली असून शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या खोदकामाविरोधात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि वनशक्ती संस्थेनं आवाज उठवला आहे. या अवैध खोदकामामुळे इथं इरसाळवाडीसारखी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त होते आहे.

बदलापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंडशीळ या आदिवासी गावालगत १० ते १५ आदिवासी पाडे आहेत. या ठिकाणी मुंबई-वडोदरा एक्सप्रेस हायवेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र काही दिवसांपासून बेंडशीळ लगतचा डोंगराळ भाग खोदण्याचं काम सुरू असून, यासाठी इथे असलेली शेकडो झाडं तोडण्यात आली आहेत.

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा नेमकं प्रकरण काय?
Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

हे काम नेमकं कोणामार्फत सुरू आहे? हा डोंगर कशासाठी खोदण्यात आला? याची कोणतीही माहिती स्थानिकांना नाही. इथले ग्रामपंचायत सदस्य सुकऱ्या हंबीर यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला देखील याबाबतची कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही.

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा नेमकं प्रकरण काय?
Shocking : ४२ सेकंदाचा व्हिडिओ काढला, सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाराने उचललं टोकाचं पाऊल; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

हा परिसर सह्याद्रीच्या डोंगर रांगेतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अशाप्रकारे अवैध खोदकाम केल्यामुळे इथं इरसाळवाडीसारखी घटना घडू शकते. तसंच पर्यावरणाची मोठी हानी देखील होत आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वनशक्तीचे नंदकुमार पवार यांनी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com