Land Partition Survey Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: मोठी बातमी! आता फक्त २०० रुपयांत होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Land Partition Survey: फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता फक्त २०० रुपयांत जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. या निर्णयामुळे १ ते ४ हजार रुपयांचे काम आता फक्त २०० रुपयांत होणार आहे.

Priya More

राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. आता फक्त २०० रुपयांमध्ये जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आता शेतीची, जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप कमी खर्चात होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या २०० रुपयांत जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मोजणी शुल्कात मोठी कपात केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. फक्त २०० रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागील उद्देश आहे. हिस्सेमोजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असे आकारण्यात येत होते. आता फक्त २०० रुपयात हे काम होणार आहे. यापुढे शेतजमीन हिस्सेवाटप मोजणी कमी खर्चात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

SCROLL FOR NEXT